Home Breaking News तेजस्वी किरणांसह २०२५ चा पहिला सुर्योदय! आज पासून करुया नवीन वर्षाची नवी...

तेजस्वी किरणांसह २०२५ चा पहिला सुर्योदय! आज पासून करुया नवीन वर्षाची नवी सुरुवात

52
0

पुणे १ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज १ जानेवारी पासून संपूर्ण देशभरात नववर्षाचे स्वागत आज पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.आजच्या दिवशी कोणी सकाळच्या रामप्रहरी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेत आहेत.तर कुणी आज १ जानेवारीचा पहिला सुर्योदय पाहण्यास पसंती देत आहेत.दरम्यान आजच्या पहाटेच्या दिवशी पुण्यातील २०२५ सूर्योदयाची मनमोहक अशी सुंदर दृश्य समोर आली आहेत.अगदी लख्ख प्रकाश अन् एकदम तेजस्वी किरणांनी जणू काही ☀️ सूर्यही नवं वर्षाचे स्वागत करत आहे.असे या दृश्यात वाटत आहे. दरम्यान आज १ जानेवारीचा पहिला सूर्योदय पाहण्या साठी मुंबईकरांनी देखील समुद्र किना-यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

दरम्यान आज १ जानेवारी २०२५ आज पासून सुरू झाले आहे.आज नववर्षाचा पहिला दिवस.आज पासून आपल्या क्षेत्रात अजून अपार मेहनत व कष्ट घेण्याचा आज पासूनच संकल्प आपण सर्वजण करुया.दरम्यान सरत्या वर्षात २०२४ मध्ये काय झाले.याकडे आता बघत न बसता याही पेक्षा २०२५ मध्ये अजून काय उत्तम अशी कामगिरी कशी करता येईल याचा सर्वांनी विचार करा.व २०२५ हे वर्ष आपल्या मेहनतीने साजरं करुया.यात तुम्हाला असंख्य अडथळे येतील.पण डगमगून न जाता आजच्या २०२५ या वर्षात यशाचं शिखर गाठण्यासाठी नक्कीच प्रयत्न करुया.दरम्यान हे वर्ष तुम्हाला व तुमच्या परिवाराला तसेच तुमच्या स्वप्नांना बळ देवो हीच मनापासून इच्छा आहे.आमच्या मराठी डिजीटल ई पेपर पोलखोलनामा व टीमच्या वतीने सर्वांना नववर्षाच्या खुप.खुप.शुभेच्छा .

Previous articleजळगावात सरत्या वर्षाला निरोप देताना दोन गटात तुफान राडा! गाड्या आणि दुचाकीची जाळपोळ
Next articleपूर्वीच्या वादातून एकाचे कु-हाडीने धडापासून मुंडके केले वेगळं.मुंडके घेऊन दोघेजण थेट पोलिस ठाण्यात हजर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here