पुणे दिनांक १ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक नवी मुंबईतील कामोठे भागातून खळबळजनक अपडेट आली असून.कामोठे येथील एका इमारतीच्या फ्लॅट मध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आई.दरम्यान यात दोन्ही जणांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेत मुलांच्या अंगावर माललेचे वळ दिसत आहे.दरम्यान या हत्याच्या घटनेनंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे
दरम्यान पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई मधील कामोठे येथील सेक्टर ६ मधील ड्रीम्ज अपार्टमेंट मध्ये दोन मृतदेह आढळल्याची घटना घडली असून यात माय लेकराची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान या घटनेत मुलांच्या अंगावर मारहाणीत अंगावर वण उठले आहेत.दरम्यान पोलिसांनी 👮 फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला . तेव्हा घरातील एलपीजी गॅस लिंक असल्याचे दिसून आले.दरम्यान पोलिसांनी दोन्ही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.दरम्यान यात हत्या की आत्महत्या याचा शोध आता पोलिस घेत आहेत.तसेच पोलिसांकडून या सोसायटीचे सीसीटीव्ही पाहण्यास सुरुवात केली आहे.