पुणे दिनांक १ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक गडचिरोली मधून मोठी अपडेट आली असून.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत.आज १ जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर गडचिरोली मधील ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.यात आठ महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.यामुळे आत्मसमर्पण करणाऱ्यांना महायुती सरकारकडून १० लाख रुपये दिले जाणार आहे.दरम्यान यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांचा सत्कार केला आहे.माओवद आता संपूर्णपणे संपुष्टात आणण्याचे काम सुरू झाले आहे.लवकरच दक्षिण गडचिरोली माओवाद्यांपासून मुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे.