पुणे दिनांक १ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती बीड जिल्ह्यातून एक अपडेट आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडी आता चांगलीच अॅक्शन मोडवर आली असून आता या खूनप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे.आज डीआयडीच्या पथकाने या खूनप्रकरणी फरार असलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांची चौकशी केली आहे.यातील आरोपी सुदर्शन घुले हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केज तालुका अध्यक्ष आहे.त्याच्यासह अन्य दोन आरोपी हे कुटुंबीयांच्या संपर्कांत आहे का ? यांचा तपास आता सीआयडीकडून सुरू आहे.दरम्यान या तीन आरोपींनी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे.