पुणे दिनांक १ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक छत्रपती संभाजीनगर येथून एक खळबळजनक अपडेट आली असून. छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुल घोटाळ्या मधील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षिरसागर याला अटक करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान क्रीडा विभागात २१ कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात हर्षकुमार क्षिरसागर हा मागील ११ दिवसा पासून फरार आहे.तसेच आता यात चार जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान हर्षकुमार क्षिरसागर याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे. त्यांने छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुलात तब्बल २१ कोटी ५९ लाख ३८ रुपयाला शासनाला गंडा घातला होता.