पुणे दिनांक २ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.राज्यात अनेक ठिकाणी पारा हा खुप खाली आला आहे.यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे तसेच पुढील काही दिवसांत विदर्भसह राज्यात अनेक ठिकाणी थंडी मोठ्या प्रमाणावर पडणार आहे.असे हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात येत आहे.दरम्यान आज नागपुरात तसेच चंद्रपुरात नाशिक . यवतमाळ पुणे .या ठिकाणी पारा खुपच खाली आला आहे.असा हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.