पुणे दिनांक २ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कॅबिनेटची बैठक झाली सदरच्या बैठकीत राज्यातील १० आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.यात काही जणांना पदोन्नती प्रमोशन देण्यात आले आहे.दरम्यान सातारा येथील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुण्यातील जिल्हा परिषदचे सीईओ संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवटे.यांची नियुक्ती भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान इतर आयएएस अधिका-यांच्या बदल्या १) जयश्री भोज यांची महाआइटी येथून अन्न नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती २) सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांची पुणे येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.३) विनिता वेद सिंघल प्रधान सचिव.कामगार यांची प्रधान सचिव पर्यावरण म्हणून नियुक्ती ४) आय ए कुंदन.एपीएस स्कूल एज्युकेशन.प्रधान सचिव कामगार नियुक्ती ५) मिलिंद म्हैसकर.अपर मुख्य सचिव.वने आणि महसूल ६) वेणु गोपाल रेड्डी.एसीएस फाॅरेस्ट.एसीएस हायर आणि टेक एड्यु.७) निपुण विनायक.रुसा सचिव.पब हेल्थ ८) संतोष पाटील.सीईओ पुणे जिल्हापरिषद यांची नियुक्ती सातारा जिल्हाधिकारी ९) हर्षदिप कांबळे. प्रधान सचिव.सामाजिक न्याय .१०) विकासचंद्र रस्तोगी.प्रधान सचिव.कृषी म्हणून नियुक्ती.करण्यात आली आहे.