पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट महाराष्ट्राची राजधानी मुंबईतून आली असून.नवी मुंबईत सानपाडा भागात आज शुक्रवारी सकाळी एक दुचाकी वरुन आलेल्या दोन तरुणांनी एकावर रिव्हाॅलवर मधून ५ ते ६ राऊंड फायर करुन लगेच दुचाकीवरून फरार झाले आहेत.दरम्यान या गोळीबारात एकजण जखमी झाला आहे.भरदिवसा सानपाड्यात गोळीबार नंतर एकच खळबळ उडाली आहे.तसेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरची घटना ही नवी मुंबई येथील सानपाडा रेल्वे स्टेशन जवळील डी मार्ट भागात घडली आहे.दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान सानपाडा येथे झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीवर ५ ते ६ राऊंड फायर झाले.त्यातील तीन गोळ्या एका व्यक्तीला लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.दरम्यान या व्यक्तीवर गोळीबार का करण्यात आला या बाबत कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकलेली नाही.परंतू गजबजलेल्या सानपाडा येथे गोळीबारा नंतर येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.