पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट हाती आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या गटात दाखल झालेले ओबीसी समाजाचे नेते व जेष्ठ मंत्री छगन भुजबळ हे आज जेष्ठ नेते शरद पवार हे आज एकाच मंचावर येणार आहेत. दरम्यान चाकण येथील चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरणा च्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येतील दरम्यान तसेच या कार्यक्रमाला आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे.तसेच खासदार अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ व दिलिप वळसे पाटील हे अजित पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत.तसेच महायुती सरकार मध्ये छगन भुजबळ व दिलीप वळसे पाटील या दोघांना देखील मंत्रीपदात डावलले असल्याने ते दोघे जण महायुतीवर व तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.तसेच ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बरोबर एकाच व्यासपीठावर आज एकत्र येत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.