पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथील पर्वती मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे.दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की. नागरी भागाचा विकास करताना पायाभूत सोयी सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात याव्यात.अशी सुचना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या आहेत.दरम्यान मंत्रालयातील दालनात नगर विकास.परिवहन . सामाजिक न्याय.वैद्यकीय शिक्षण.तसेच अल्पसंख्याक विकास विभागाचा पदभार स्वीकारला त्या नंतर त्या बोलत होत्या.यावेळी स्वच्छतेबाबतही जनजागृती करण्यासाठी योजना आखण्याच्या सुचना माधुरी मिसाळ यांनी दिल्या आहेत.