पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक खळबळजनक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचे माळशिरस येथील आमदार उत्तम जानकर यांनी आज ईव्हीएमच्या मुद्यावरुन येत्या तीन महिन्यांत महायुतीचे सरकार पडणार आहे.असा एक दावाच आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.दरम्यान सरकार पाडण्याचे पुरावे सादर केल्यानंतर देश गडबडून जाईल.महायुती सरकार मध्ये हिंमत असेल तर बारामती व माळशिरस या दोन मतदारसंघातील निवडणूका बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्या.मी जेव्हा पुरावे सादर करेल तेव्हा देश देखील गडबडून जाईल.पुन्हा यांना कोणताही पर्याय राहणार नाही.असा एक प्रकारे मोठा दावा देखील यावेळी बोलताना माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.त्यांच्या या दाव्याने महाराष्ट्रा च्या राजकारण एकच खळबळ उडाली आहे.