Home Breaking News बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मोठी कारवाई,SITने दोघांना घेतले ताब्यात...

बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मोठी कारवाई,SITने दोघांना घेतले ताब्यात चौकशी सुरू

63
0

पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी खळबळजनक अपडेट हाती आली असून ‌.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात आता गती आली असून या प्रकरणी आज हत्याकांडातील आरोपींना पळून जाण्यास मदत करणा-या दोन जणांना बीड जिल्ह्या मधून SIT ने ताब्यात घेतले आहे.या प्रकरणात आता बीड मधील डॉ संभाजी वायबसे व धारुर येथून एक जण अशा दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेऊन SIT ने त्यां दोघांना पोलिस स्टेशन मध्ये आणून त्यांची चौकशी करत आहेत ‌दरम्यान या दोघांची आता सीआयडी कसून चौकशी करत आहेत.दरम्यान या खूनप्रकरणी फरार असलेल्या तीन आरोपींची माहिती मिळवण्यासाठी चौकशी सुरू आहे.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी व खंडणी बाबत तपास सीआयडी व SIT तसेच आणि स्थानिक पोलिस प्रशासन या तीन तपास यंत्रणांच्या माध्यमातून केला जात आहे.दरम्यान आज SIT बीड जिल्ह्यातील दाखल झाल्यानंतर SIT ने संबंधित अधिकारी यांची भेट घेऊन तपासाची सगळी माहिती घेतली आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात तीन आरोपी फरार आहेत.या तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.हे आरोपी जिल्हा प्रशासन व सीआयडी तपास करीत असून अद्याप हे फरार आरोपी त्यांच्या हाताला लागले नाहीत.दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील व खंडणी प्रकरणातील आरोपी १) सुदर्शन घुले २) कृष्णा आंधळे ३) सुधीर सांगळे हे फरार आहेत.हे तीनजण वाल्मीक कराड याच्यासाठी काम करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान खंडणीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपी वाल्मीक कराड हा ३१ डिसेंबर रोजी पुणे येथे सीआयडीकडे शरण आला होता.त्याला न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कस्टडी सुनावली आहे. या खूनप्रकरणातील मुख्य तीन आरोपी फरार आहेत. यांनी गुन्ह्यात वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.तसेच कारमध्ये या आरोपींचे मोबाईल देखील सीआयडीला सापडले आहेत.यात खून करताना व्हिडिओ व मोबाईल वरून अन्य लोकांशी संवाद हे सर्व सीआयडीकडे उपलब्ध आहे.आता या तीन फरार आरोपींना मोस्ट वाॅन्टेट म्हणून घोषित केले आहे.

Previous articleआमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेचे पोलिसांकडून चित्रिकरण, आव्हाड पोलिसांवर चिडले
Next articleमुंबईत सानपाडा नंतर मिरारोड येथे गोळीबार एकजण जागीच ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here