पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार लाडकी बहीण योजनेवरुन आता आदिती तटकरे व प्रणिती शिंदे यांच्यात आता आरोप व प्रत्यारोप सुरु झाला आहे.दरम्यान महायुतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना ही सुरु केली होती.त्यावेळेस सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना बाबत प्रचार सुरू केला.व याच योजना मुळे हे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले.दरम्यान लाडकी बहीण योजना निवडणूकीसाठी चुनावी जुमला होता.त्यांनी तो व्यवस्थित खेळला असे सोलापूरच्या काॅग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की.विरोधकांना लाडकी बहीण योजनेची अॅलर्जी आहे.एका बाजूला १५०० रुपये दिले तर राज्य आर्थिक संकटात येईल म्हणतात आणि दुस-या बाजूला स्वतः ३ हजार रुपये देण्याचे वक्तव्य करतात हे बोलणं दुटप्पीपणाचं आहे. असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.