पुणे दिनांक ३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून अपडेट हाती आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्या मधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याच्या आरोपावरून सीआयडी न्यायालयीन कोठडीत असलेले वाल्मीक कराड याला स्लीप अॅन्प्रियाचा त्रास असल्याने आता कराड याने बीड जिल्हा व सत्र न्यायालयाकडे कोठडीत असताना २४ तास मदतनीस देण्याची मागणी केली आहे.यावेळी त्यांने न्यायालयात म्हटले आहे की.मला स्लीप अॅन्प्रिया नावाचा आजार आहे.मला झोपताना ऑटो सीपॅप मशीन लावण्यासाठी मदतनीस हवी आहे. अशी विनंती केली आहे.
दरम्यान या आजारांमध्ये स्लीप अॅन्प्रिया म्हणजे झोपेत श्र्वसनाला होणारा अडथळा तसेच झोपेत घोरणे किंवा मोठ्यानं आवाज करणे हा आहे.दरम्यान या आजारांमध्ये शरीराच्या वरच्या भागाच्या विचित्र हालचाली होतात.आणि जिभेमागचे काही स्नायू शिथिल होतात.तसेच तुमचे जीभ आणि घशातील स्नायू प्रमाणाबाहेर शिथिल झाले तर तर श्र्वासन नलिका कोंडते.तसेच ऑक्सिजन मेंदू पर्यंत पोहोचू शकत नाही.तसेच यामध्ये स्लीप अॅन्प्रियाचा कालावधी वाढलातर हृदय तसेच रक्तदाब आणि मधुमेह यावर देखील परिणाम होऊ शकतो.