पुणे दिनांक ४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट छत्तीसगड येथून येत असून.छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी काही दिवसांपूर्वी बस्तर येथील १२० कोटी रुपयांच्या रस्ते व बांधकाम प्रकल्पातील कथित घोटाळा समोर आणला होता.दरम्यान या नंतर १ जानेवारीच्या रात्री पासूनच तो आश्चर्यकारक रित्या गायब झाला.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 👮 तपास सुरू केला असता त्याचा मृतदेह सेफ्टीक टॅन्कमध्ये आढळून आला आहे. दरम्यान या पत्रकारांच्या हत्या मधील गुन्हेगारांना कठोरपणे शिक्षा दिली जाईल असे छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी आश्र्वासन दिले आहे.