पुणे दिनांक ४ डिसेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आता थंडीची चांगलीच लाट आली आहे.तर एकंदरीत थंडीने पुन्हा कमबॅक केलं आहे.दरम्यान या जिल्ह्यात थंडी भयंकर प्रमाणावर वाढली आहे.पुणे.नाशिक.तसेच नागपूर या जिल्ह्यात हुडहुडी चांगलीच वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.दरम्यान आता पुढील काही दिवसांत थंडीचे प्रमाण अधिक वाढणार आहे.असे हवामान विभागा च्या वतीने सांगण्यात आले आहे.तरी महाराष्ट्रातील नागरिकांनी यांची काळजी घ्यावी.असे आवाहनही करण्यात आले आहे.दरम्यान विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा १० अशांच्या खाली आला आहे.तर धुळे शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून तेथील तापमान हे सगळ्यात कमी ७ अंश असे नोंदवले गेले आहे.अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे.त्या मुळे वाहन धारकांनी वाहने सावकाश चालवावी त्या मुळे अपघातापासून बचाव होऊ शकतो.