पुणे दिनांक ४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून अपडेट आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना बीड जिल्हा गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक करण्यात आली होती.त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.यातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसां ची पोलिस कस्टडी दिली आहे.यातील दोन मुख्य आरोपी १) सुदर्शन चंद्रभान घुले ( वय २८ रा.टाकळी ता.केज .जि.बीड ) २)सुधीर ज्ञानोबा सांगळे ( वय २३ रा.टाकळी ता.केज .जि.बीड ) ३) सिध्दार्थ सोनवणे ( रा मस्सजोग .ता.केज जि.बीड ) अशी आहेत.यातील सुदर्शन व सुधीर हे सरपंच देशमुख यांच्या हत्यामधील मुख्य आरोपी आहेत.यांचा तिसरा साथीदार कृष्णा शामराव आंधळे (वय ३० रा.मैदवाडी ता.धारुर जि.बीड )हा फरार असून याचा शोध बीड गुन्हे शाखेच्या पोलिस घेत आहेत.यातील सिध्दार्थ सोनवणे हा सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील असून यांनेच सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन यातील आरोपींना दिले होते.याला मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.या सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.