पुणे दिनांक ४ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी बीड जिल्ह्यातील एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फरार असलेल्या तिन्ही आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी 👮 आवळल्या आहेत.दरम्यान खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला वाल्मीक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाला होता.तो सध्या सीआयडीच्या १४ दिवसांच्या कोठडीत आहे.दरम्यान मस्साजोग गावाच्या नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केले होते.व फरार असलेल्या तीन आरोपींना तातडीने अटक करण्यात यावे अशी मागणी पोलिसांकडे केली होती.
दरम्यान आता पोलिसांनी 👮 फरार असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे.१) सुदर्शन घुले २) कृष्णा आंधळे ३) सुधीर सांगळे.यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.दरम्यान या संदर्भात थोड्याच वेळात पोलिस पत्रकार परिषद घेणार आहेत.दरम्यान या तीन पैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे तर तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे.अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.यातील कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याचे समजते.पण पोलिसांनी 👮 एकूण तीन आरोपींना अटक केली आहे.तर एकाला पुण्यातूनच अटक करण्यात आली आहे.दरम्यान ९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.त्यांच्या हत्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.थोड्याच वेळात बीड पोलिस हे पत्रकार परिषद मध्ये संपूर्ण माहिती देणार आहेत.