पुणे दिनांक ५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक सातारा येथून खळबळजनक अपडेट हाती आली असून.आज रविवारी सकाळी कोयना धरण परिसरात पहाटेच्या सुमारास धक्के जाणवले आहेत.हे धक्के पहाटे ६ वाजून ५७ मिनिटां नी इथे २.०रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत.दरम्यान धरणाच्या पूर्वेकडील परिसरात हा भूकंप झाला आहे.यामुळे कोयना धरणा ला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. दरम्यान यापूर्वी देखील इथे भूकंपाचे धक्के बसले आहेत.तर या धरणाला सर्वात मोठा भूकंप सन १९६७ साली झाला होता तो भूकंप सर्वात मोठा म्हणजे ६.६ तीव्रतेचा होता .