पुणे दिनांक ५ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व पक्षीय व मराठा समाजाच्या वतीने भव्य असा मोर्चा झाला .यावेळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच नि:पक्षपणे चौकशी व्हावी.दरम्यान या मोर्चाला संबंधित करताना भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन यावेळी खळबळजनक आरोप केले आहेत.धनजंय मुंडे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान सातपुडा बंगल्यावर खंडणी संदर्भात डील झाली असे म्हणून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची चांगलीच पोलखोल पुण्यातील सभेत केली आहे.
यावेळी बोलतांना आमदार धस पुढे म्हणाले की.वालू बाबांचे (वाल्मीक कराड) चे १०० बॅक अकाउंट आहेत पुण्यात त्यांचे भरपूर फ्लॅट आहेत .याची देखील ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा जो खून झाला दरम्यान या प्रकरणाची खरी सुरुवात एप्रिल – में महिन्यापासून झाली.नितीन बिक्कड एक माणूस खंडणीच्या प्रकरणा मध्ये आहे. नितीन हा धाराशिव व बीड जिल्ह्यात कंपन्यांच्या सेक्युरिटीचं काम घेतो.याची आणि वाल्मीक कराड याची भेट झाली त्यानंतर ते दोघे सोबत काम करायला लागले १४ जून पूर्वी कराड आणि नितीन यांची ओळख झाली.व १४ जूनला वाल्मीक कराड.नितीन बक्कड.अनंत काळकुटे यांची परळीला मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली होती.आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन नितीन वाल्मीक कराडकडे गेला होता.त्यावेळी मंत्री धनंजय मुंडेंचा पीए जोशी यांच्या मार्फत ते थेट मंत्री धनंजय मुंडे यांना भेटायचा प्रयत्न करत होते.त्यानंतर वाल्मीक कराड यांने पीए जोशीचा चांगलाच समाचार घेतला.त्यानंतर आवदा कंपनीच्या लोकांसमावेत बैठक झाली १९ जुनं २०२४ रोजी मंत्री छगन मुंडे यांचा मुंबईतील शासकीय बंगला सातपुडा येथे बैठक झाली. दरम्यान या बैठकीला आमदार कंपनीचे अल्ताफ तांबोळी.शुक्ला.व वाल्मीक कराड व नितीन बिक्कड यांच्यात बैठक झाली.या बैठकीत वाल्मीक कराड यांनी ३ कोटी रुपये मागितले.त्यानंतर तांबोळी व शुक्ला यांनी यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी यांना फोन केला.यावेळी कंपनीने तीन नाही तर आम्ही दोन कोटी रुपये देतो असं सांगितले दरम्यान ‘ बैठकीत पैशाबाबत नेमके ठरलं नाही.नंतर ठरवू असे म्हटले आणि गेले.नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी ५० लाख रुपये मागण्यात आले.व तेवढी रक्कम घेतली. तसेच जाता जाता.कृष्णा कुटे नावाच्या ओम साई राम नावाच्या कंपनीला मस्साजोग गावाचे सिक्युरिटीचे काम दिले.तो चालवतो नितीन बिक्कड यावेळी काळकुटे बंगल्यावर नव्हता.दरम्यान कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन त्यांच्या उपस्थितीत ही खंडणीची डील झाली.असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुण्यात केला आहे.