पुणे दिनांक ६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी आज सोमवारी सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे राज्यपाल. सी. पी.राधाकृष्णन यांची भेट मुंबईत घेणार आहेत.तसेच बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खुपच बिकट झाला आहे.त्याबाबत राज्यपाल यांना पत्र देखील देण्यात येणार आहे.या शिष्टमंडळात भारतीय जनता पार्टी .शरद पवार गट.उध्दव ठाकरे गट.एकनाथ शिंदे गट.तसेच अजित पवार गटाचे नेते मंडळी यात असणार आहेत.आज सकाळी साडे दहा वाजता भेटणार आहेत.दरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात एकूण सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.तरी यातील काही गुन्हेगार हे अद्याप फरार झाले आहेत.