पुणे दिनांक ६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट राजकीय वर्तुळातून येत आहे.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणांवरुन आता संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले असून दरम्यान अन्न व नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भेटी साठी दाखल झाले आहेत.मागील तीस मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणांवरुन विरोधक व सत्ताधारी आमदारांनी महाराष्ट्रात मुंडे यांच्या विरोधात चांगलेच राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.दरम्यान आज सर्वपक्षीय नेत्यांनी सकाळीच मुंबईत राज्यपाल यांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घ्यावा असे पत्रच राज्यपाल यांना दिले आहे.दरम्यान आज चर्चा नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय निर्णय घेणार हे आता पाहायला लागणार आहे.