पुणे दिनांक ६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती आलेल्या अपडेट नुसार पालघर जिल्ह्यांमध्ये आज सोमवारी पहाटे तीन वेळा सलग भूकंपाचे धक्के जाणवले आहेत दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचे भूकंपाचे धक्के हे डहाणू व दापचरी परीसरात जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच पहाटेच्या वेळेस थंडीच्या दिवसात देखील भूकंपाच्या धक्क्याने नागरिक जिवाच्या आकांताने तातडीने घराबाहेर पळाले आहेत.तसेच या भागातील काही घरांना तडे देखील गेले आहेत.दरम्यान सदरचा भूकंप किती रिश्टर स्केलचा होता.हे अद्यापतरी स्पष्ट होऊ शकलेले नाही.पण या भूकंपात सुदैवाने कोणतीही प्रकारची घरांची पडझड किंवा जीवीत हानी झालेली नाही.