पुणे दिनांक ६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी तपास करण्या साठी एसआयटीची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान आता यातील तीन जणांची हकालपट्टी करण्यात आली आहे.यात एपीआय महेश विघ्ने व हवालदार मनोज वाघ.तसेच अन्य एक पोलिस उपनिरीक्षक यांचा या हकालपट्टीत समावेश आहे. दरम्यान यातील सर्वजण हे खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले व कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते वाल्मीक कराड यांच्या जवळचे असल्याचा या सर्व पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.तसेच यातील एक एपीआय महेश विघ्ने यांचा फोटो आरोप असलेले वाल्मीक कराड यांच्या बरोबर आहे.आणी काल पासून हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हा फोटो ट्विट केला आहे.आता सर्वच थरातून टीका व्हायला लागल्या नंतर या तीन जणांना एसआयटीच्या टीम मधून बाजूला केले आहे.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.