पुणे दिनांक ६ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी बीड जिल्ह्यातून एक अपडेट हाती आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याबाबत आता सीआयडी.एसआय टी कडून कसून चौकशी सुरू आहे.आता खूना नंतर यातील तीन आरोपी बीड मधुन कसे बाहेर पडले यांची माहिती पोलखोलनामाच्या हाती आली आहे.दरम्यान आरोपी सुदर्शन घुले.कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे हे बीड मधून बाहेर जाण्यासाठी जंगलातून ३० किलो मीटर प्रवास करत ते बीडच्या बाहेर पडताच एका खासगी ट्रॅव्हल्सने थेट छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले .व तेथून आरोपी मुंबई भिवंडी येथे दाखल झाले.व भिवंडीतून रेल्वेने थेट गुजरातला गेले.तिथेच तब्बल १५ दिवस ते एका गिरनारच्या मंदीरात थांबले. दरम्यान त्यांच्या कडील पैसे संपल्यानंतर तिन्ही आरोपी पैसे घेण्यासाठी पुण्यात बालेवाडीत दाखल झाले होते.पण पैसे घेण्यापूर्वीच त्यांना बीड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 अटक केली.यातील तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार झाला.
दरम्यान मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी शोधून काढण्या साठी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षनेते तसेच सत्ताधारी यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.तसेच मस्साजोग गावातील लोकांनी मोर्चा व आंदोलन सुरू केले.या खूनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले.सरकारच्या वतीने बीड येथील तत्कालीन पोलिस अधीक्षक यांची तातडीने बदली केली.तसेच सदरचा तपास सीआयडीकडे तसेच एस आयटी कडे देण्यात आला . पोलिसांनी 👮 बीड येथील एका डाॅक्टर व त्याची वकिल असलेली बायको अशा दोघांच्या नांदेड येथून मुसक्या आवळल्या नंतर डॉ.संभाजी वायभासने यांनी या तीन आरोपींबाबत पोलिसांना माहिती दिली.व नंतर पोलिसांनी 👮 पुणे येथील बालेवाडी येथून घुले व सांगळे यांना शनिवारी पहाटे अटक केली आहे.तर यातील तिसरा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे.त्याचा देखील शोध पोलिस घेत आहेत.