पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणांवरन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व अन्न धान्य नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी व विरोधक आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लावून धरली आहे.तसेच काल मुंबईत राज्यपाल यांना लेखी स्वरूपात राजीनामा द्यावा अशी तक्राराच सर्व राजकीय पक्षातील आमदारांनी केली आहे.आता यात पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात करुणा मुंडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.तसेच कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून २०२४ ची विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आणि इतर आरोप आता करुणा मुंडे यांनी केले आहेत.त्यामुळे आता अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.