पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक नेपाळ तिबेट वरुन भूकंपाची अपडेट आली असून.आताच चीनच्या एका वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिबेट मध्ये आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास भूकंप झाला होता . दरम्यान सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार ३५ जणांचा मृत्यू झाला होता.दरम्यान या भूकंपात मृतांचा आकडा वाढला असून जवळपास १२५ जणांचे मृतदेह आतापर्यंत मदत पथकाच्या हाती लागले आहे.तर यात १८८ पेक्षा जास्त नागरिक हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान आज नेपाळ तसेच भुतान . तसेच भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.दरम्यान तिबेट येथील भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केल हा ७.१ इतका होता.सदर फोटो मध्ये अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली दिसत आहे.तर अनेक इमारतींना मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत.