पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील न-हे येथे पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणात न-हेगावच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.दरम्यान सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी हा आदेश दिला आहे. दरम्यान न-हे येथील सुशांत सुरेश कुटे ( रा.चैतन्य बंगला मानाजी नगर पुणे) असे अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुटे हा. न-हेगावचा माजी उपसरपंच आहे.तर समर्थ नेताजी भगत (वय २०रा.व्यकंटश्र्वेरा सोसायटी.अभिनव काॅलेज रोड न-हे पुणे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दरम्यान या प्रकरणी नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. दरम्यान या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सिंहगड भागातील न-हे मानाजीनगर या भागात दिनांक २५ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कुंटे यांच्या ऑफिस समोर हा सर्व प्रकार घडला होता. दरम्यान समर्थ याच्या मोटार सायकल मधील पेट्रोल संपले होते.व तो दुसऱ्या गाडीतून पेट्रोल काढत असल्याच्या संशयावरून आरोपी गौरव संजय कुटे व त्याचे अन्य २ ते ३ साथीदारांनी त्याला लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून गंभीर रित्या जखमी केले.त्यात त्याचा मृत्यू झाला होता.दरम्यान या गुन्ह्यात कुटे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.त्यांच्या जामीन अर्जाला सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. दरम्यान सदरचा गुन्हा झाल्यापासून अर्जदार आरोपी हा फरार आहे.तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात आरोपीचे नाव आले आहे.तसेच गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याला अटक करणे गरजेचे आहे. असा युक्तिवाद न्यायालयात केला आहे.