पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातूनच खळबळ जनक व धक्कादायक घटनेची अपडेट आली असून. पुण्यातील एका आयटी कंपनीतील युवतीवर तिच्याच सहका-यानेच धारदार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी येरवडा भागात घडली आहे.दरम्यान सदरच्या हल्ल्यात ही युवती गंभीर रित्या जखमी झाली आहे.या हल्ल्याबाबत येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जखमी झालेल्या युवतीचे नाव शुभदा शंकर कोदारे (वय २८ रा.बालाजी नगर कात्रज पुणे) असं आहे.दरम्यान हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३० रा.खैरेवाडी शिवाजी नगर पुणे) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेली युवती मुळची कराडची असून येरवडा भागातील रामवाडी येथील एका आयटी कंपनीत काॅल सेंटरमध्ये कामास आहे. दरम्यान तिच्या याच कंपनीतील सहकारी कृष्णा याच्या बरोबर युवतीचा काही कारणास्तव वाद झाला होता. यावेळी कृष्णा यांने तिला पार्किंग मध्ये गाठत युवतीवर वार केले.यात सदरची युवती गंभीर रित्या जखमी झाली असून तिला उपचारासाठी येरवडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी संबंधित घटनेची माहिती दिली आहे.