Home Breaking News ‘भारतपोलमुळे सुरक्षित भारताचे आता स्वप्न पूर्ण होईल ‘

‘भारतपोलमुळे सुरक्षित भारताचे आता स्वप्न पूर्ण होईल ‘

47
0

पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआयच्या ‘भारतपोल) पोर्टलचे लोकापर्ण केले. याच्या माध्यमातून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारां ना पकडण्यात आणि सुरक्षेच्या आव्हानांचा सामना करण्यास मदत होईल.त्यामुळे फरार गुन्हेगारांवर  कारवाई करणे सोपे होईल.दरम्यान सुरक्षित भारत निर्माण करण्याचे स्वप्न या पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.आधुनिक सुविधा वापरण्याची हीच वेळ आहे.असे यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले आहेत.

आता नेमका ‘भारतपोल’ चा फायदा काय आहे.ते समजून घेऊ या.दरम्यान भारत देशात गुन्हे करून  परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी हे  पोर्टल उपयुक्त आहे.तसेच फरार व्यक्तींवर अनुपस्थिती त खटला चालवला जाऊ शकतो.तसेच रेड नोटीस. डिफ्यूजन नोटीस.व इंटरपोल नोटीस जारीच्या प्रक्रियेला वेग तसेच पोलिसांना सीबीआय कडून तातडीने माहिती मिळवण्यास मदत होईल.तसेच सर्व राज्यातील तपास यंत्रणा आणि पोलिसांना १९५ देशांच्या इंटरपोल नेटवर्कशी कनेक्शन असल्याने गुन्हे नियंत्रणात महत्त्वाची भूमिका हे पोर्टल बजावेल

Previous articleमुंबईचा डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा न्यायालयाकडून मंजूर
Next articleन-हेमधील युवकाच्या खूनप्रकरणी माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here