Home Breaking News मुंबईचा डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा न्यायालयाकडून मंजूर

मुंबईचा डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा न्यायालयाकडून मंजूर

55
0

पुणे दिनांक ७ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.मुंब‌ई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पीठाने आज मंगळवारी कुख्यात डॉन अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा (फरलो) मंजूर केली आहे. दरम्यान या प्रकरणी सदरचा निर्णय न्यायाधीश नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी दिला आहे.

दरम्यान अरुण गवळीने संचित रजेसाठी दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी कारागृह उपमहानिरीक्षक यांच्या कडे अर्ज सादर केला होता.परंतू अरुण गवळी हा गुन्हेगारांच्या टोळीचा मुख्य म्होरक्या असल्याच्या कारणावरून त्याला रजेवर सोडल्यास विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल या कारणांमुळे अरुण गवळीचा अर्ज नामंजूर करण्यात आला होता.या निर्णया विरुध्द अरुण गवळीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.अरुण गवळीच्या वतीने वकील मीर नगमान अली यांनी कारागृह उपनिरीक्षकांचा निर्णय अवैध असल्याचा दावा न्यायालयात केला . त्यानंतर न्यायालयाने अरुण गवळीची याचिका मंजूर कारागृह उपमहानिरीक्षकांचा वादग्रस्त आदेश रद्द करुन डॉन अरुण गवळीची २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे.दरम्यान कुख्यात डॉन अरुण गवळीने शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा नागपूर येथील कारागृहात भोगत आहे.शिवसेना नगरसेवक जामसंडेकर यांचा खून २००७ मध्ये झाला होता.

Previous articleनेपाळ मध्ये भूकंपात ३२ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भिती
Next article‘भारतपोलमुळे सुरक्षित भारताचे आता स्वप्न पूर्ण होईल ‘

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here