पुणे दिनांक ८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी एक अपडेट हाती आली असून बीड आणि परभणी हत्याकांड प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरत आहे.तसेच चांगलेच चर्चेत देखील आले आहे.रोज माध्यमांच्या माध्यमातून नव नवीन खुलाशे होत आहे.व तशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना एकंदरीत दिसत आहे.काल मंगळवारी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणा नंतर देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक निर्णय घेतला आहे की संतोष देशमुख यांच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचा म्हणजेच त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांतील देखील एकाला शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान वाकोडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.