पुणे दिनांक ८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही आंध्रप्रदेशातील तिरुपती येथून आली आहे.दरम्यान आज बुधवारी सायंकाळी ९५ नंबर केंद्रावर दर्शनाचे टोकन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक हे रांगेत उभे होते.दरम्यान सर्वजणांनी टोकन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.यांच दरम्यान भाविकांमध्ये अचानकपणे चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत एकूण सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तसेच अनेकजण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.त्यांना रुया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान सदरची घटना ही मंदीर व्यवस्थापन यांच्या मुळेच झाली आहे.असा ठफका भाविकांनी मंदिर व्यवस्थापनावर ठेवला आहे.व राग व्यक्त केला आहे.