Home Breaking News भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदाराच्या व नगरसेवकांच्या घरात कंपन्यात सापडला कुबेराचा खजिना

भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदाराच्या व नगरसेवकांच्या घरात कंपन्यात सापडला कुबेराचा खजिना

125
0

पुणे दिनांक ८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट मध्यप्रदेश मधून आली असून.आयकर विभागाच्या वतीने घरावर धाड टाकली आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदाराच्या घरात कुबेराचा खजिनाच मोठ्या प्रमाणावर सापडला आहे.त्यामुळे आता या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा बीपीच हाय झाला आहे.दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेश राज्यातील साखर जिल्ह्यात माजी आमदार हरवंश सिंह राठौर व माजी नगरसेवक राजेश केशरवानी यांच्या घरावर तसेच कंपनीवर आयकर विभागाच्या वतीने छापेमारी करण्यात आली आहे.सदरच्या छापेमारीत १५० कोटी रुपयांची रक्कम व २०० कोटी पेक्षा अधिक मालमत्ता तसेच १९ किलो सोने व १४४ कोटी रुपयांनी रोखीने केलेले व्यवहार व ७ कोटी रुपयांच्या लक्झरी कार आयकर विभागाला सापडल्या आहेत.अजून देखील तपास सुरू आहे.दरम्यान या भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदाराच्या व नगरसेवकांच्या घरात आणि कंपनीत कुबेराचा खजिनाच सापडला आहे.

Previous articleमुंबईतील नागरिकांना करोडो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या तीन जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Next articleतिरुपतीत टोकन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here