पुणे दिनांक ८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.मुंबईतील लाखो नागरिकांना पैसे डब्बल करून देण्याचे खोटं आमिष दाखवून त्यांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोरेस कंपनी च्या तीन जणांच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी 👮 आवळल्या आहेत.दरम्यान हेराफेरी मुव्ही सारखी मेथड या टोरेस कंपनीने मुंबईत आवलंबवली आणि तुम्हाला करोडपती करतो असे सांगून मुंबईतील लाखो लोकांची या कंपनीने करोडो रुपयांची फसवणूक केली आहे.सदर कंपनीत अनेकांनी दाग दागिने गहाण ठेवून या कंपनीत पैसे गुंतवले तर कुणी कंपनी मधून कर्ज घेऊन यात पैसे गुंतवले दरम्यान सर्व मुंबईकरांचे पैसे घेऊन या कंपनीच्या संचालक मंडळ व कर्मचारी यांनी पोबारा केला आहे.आता या प्रकरणी पोलिसांनी 👮 उझबेकिस्तानची रहिवासी असलेली जनरल मॅनेजर तानिया कसातोवा तसेच संचालक अशोक सुर्वे. व एक रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हालेंटिना गणेश कुंभार या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान या कंपनीचा संचालक हा महाराष्ट्रातील असून त्यांने या कंपनीत दोन परदेशातील महिलांना या कंपनीत अक्कल हुशारीने कामावर ठेवले होते.पण आता यांचा खेळ खल्लास झाला असून या सर्वांची उकल आता पोलिस करत आहेत.