पुणे दिनांक ८ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार गटाचे एकूण आठ खासदार पुतणे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्या चे वृत्त येत आहे.दरम्यान सत्ता नसल्याने पुढील राजकारण कसे करायचे ?तसेच खासदार यांच्या मतदारसंघातील कामे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.असा एक नवीन प्रश्न शरद पवार गटाला पडल्याने त्यासाठी सत्तेत जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान दोन्ही पवार हे एकत्र यावे यासाठी एक मोठे उद्योगपती देखील कसोशीने प्रयत्न करत आहेत.अशी देखील मध्यंतरी चर्चा झाली होती. व तशी माहिती देखील मिडिया मध्ये आली होती.दरम्यान शरद पवार यांच्या कन्या व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यांना केंद्रात मोठ्या खात्यावर वर्णी लावण्यासंदर्भात देखील जेष्ठ नेते शरद पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत.अशी देखील चर्चा सुरू आहे.दरम्यान या पूर्वी शरद पवार गटाकडून अजित पवार यांच्यावर होणारे राजकीय हल्ले देखील ब-याच प्रमाणावर शरद पवार गटाकडून कमी झाले आहे.तसेच अजित पवार आणि शरद पवार हे दोघे काका पुतण्या राजकारणात एकत्र यावे अशी दोन्ही कुटुंबीयांची देखील जेष्ठांची इच्छा आहे.व त्या त्यांनी तशा प्रगट देखील केल्या आहेत.यात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री व आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री यांनी देखील हे स्पष्ट केले आहे.