पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच बीड जिल्ह्यातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.सीआयडीने वाल्मीक कराडचे तीन मोबाईल जप्त केल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान या तिन्ही मोबाईलची फाॅरेन्सिक तपासणी जाणार आहे.तसेच सीआयडी आता या बाबत कराडच्या आवाजाचे नमुने देखील घेणार आहे. दरम्यान कालच वाल्मीक कराडच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार होते.पण विष्णू चाटेच्या आवाजाचे नमुने घेण्यास उशिर झाल्याने कराडच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले नाही.अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मार्फत पवन चक्कीची निर्मिती करणाऱ्या आवदा एनर्जी कंपनी कडून २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.तर चाटे हा आवदा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मीक कराडला भेटण्यासाठी गेला होता. असा देखील आरोप आहे.