पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळ जनक आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आले असताना पुण्यातील वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच चिडले होते.त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की पुणे 👮 पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे.वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना पुण्यातील गुन्हेगारीवर पायाबंद घालण्यात येत नसेल तर त्यांनी सोडावे.अशा एकदम कडक शब्दात पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान यावेळी पुणे महापालिकेचे अधिकारी तसेच पोलिस प्रशासनाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात बैठक घेतली.दरम्यान सदर बैठकीच्या नंतर ते माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की पुणे येथील कोयता गॅंग आणि इतर वाढत्या गुन्हेगारीच्या घटना संदर्भात उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.दरम्यान पुणे पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करण्यास अडचण येत नाही.तर गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.याला पोलिस कमी पडत आहे.जर वरिष्ठ अधिकारी यांना जमत नसेल तर त्यांनी काम सोडावे.आम्ही दुसरे अधिकारी आणू.अशा एकदम कडक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.