पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक आंध्रप्रदेश येथील तिरुपती बालाजी येथून एक अपडेट असून दरम्यान तिरुपती मधील चेंगराचेंगरीत माझी पत्नी गेली म्हणून एक भाविक व्यंकटेश हा ढसाढसा रडतो असल्याचा व्हिडिओ मध्ये समोर भयानक वास्तव हे चेंगराचेंगरीचे आले आहे.दरम्यान तो मिडिया बरोबर बोलताना त्यांने हि दुर्दैवी घटना कशी घडली हे वास्तव सांगितले आहे. दरम्यान हा भाविक व्यंकटेश हा विशाखापट्टणम येथून त्याची पत्नी शांती व मुलगा हे काल वैकुंठ दर्शना साठी आले होते.देवाचे दर्शन घेणार म्हणून सर्व आंनदीत होते .मात्र नशिबाने त्यांचे आयुष्यच हिरावून घेतले.
दरम्यान तिरुपती बालाजी येथे पोलिसांचा प्रचंड असा बंदोबस्त असतानाही तिकिट केंद्राजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.दरम्यान या चेंगराचेंगरीत एकूण सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे.यात अन्य भाविक हे जखमी झाले आहेत.दरम्यान तिरुपतीचे जिल्हाधिकारी यांनी या दुर्दैवी अशा घटनेचे कारण सांगितले आहे.तिकिट केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता.तसेच गर्दी होऊ नये म्हणून एक गेट बंद करण्यात आले होते.मात्र रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला त्रास होत असल्याने एक गेट उघडण्यात आले होते.त्याच वेळी भाविकांनी आत प्रवेश केला व मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली व सदरची घटना घडली आहे.तसेच तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टच्या वतीने देखील असाच दावा केला आहे.