Home Breaking News पाचगणीतील हाॅटेलमधील छमछमवर सातारा पोलिसांचा छापा, पोलिसांच्या कारवाईत १२ बारबालांसह ३२ जणांना...

पाचगणीतील हाॅटेलमधील छमछमवर सातारा पोलिसांचा छापा, पोलिसांच्या कारवाईत १२ बारबालांसह ३२ जणांना अटक २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

89
0

पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट सातारा जिल्ह्याती पाचगणी थंड हवेचे व हिल ठिकाण येथून आली असून.पाचगणी हिल स्टेशन येथील एका हाॅटेल मध्ये सुरू असलेल्या छमछम लेडीज बारवर पोलिस यांनी छपा टाकून तब्बल २५ गि-हाईक यांना अटक केली असून त्यांच्यावर पाचगणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान या बार मधून ध्वनिक्षेपक यंत्रणा.माईक . मोबाईल फोन.व कार असा एकूण २५ लाख ४५ हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ बारबालांना देखील अटक करण्यात आली आहे.

दरम्यान सदर बार बदल पोलिस सूत्रांकडून मिळालेल्य माहिती वरुन सातारा येथील भिलार येथील हिराबाग येथे एका डान्स बार वर छापा टाकण्यात आला.या हाॅटेल मालकाला देखील अटक करण्यात आली आहे. या डान्स बारमध्ये गायिकांच्या आणि वेटरच्या नावा खाली बारबाला आणल्या जात होत्या.त्या बारबाला यांना म्युझिकवर कमी कपड्यात नृत्य करण्यास‌ भाग पाडले जात होते.दरम्यान या डान्स बारची माहिती पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित डान्स बारवर छापा टाकून यावर कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पाचगणी पोलिस करत आहेत.

Previous article‘खरी शिवसेना शिंदेंची नसून ठाकरेंचीच ‘ महायुतीत पुण्याचे ओसवाल यांनी टाकला मिठाचा खडा
Next articleछत्तीसगडमध्ये कंपनीची भलीमोठी चिमणी कोसळून ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू ,तर चिमणीखाली २५ कामगार अडकले कामगारांमध्ये एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here