पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातूनच राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.पुण्यातील नगरसेवक बाळा ओसवाल यांनी म्हटले आहे.दरम्यान पुण्याचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह उध्दव ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवकांनी मुंबईत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात परवाच्या दिवशी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत पक्षप्रवेश केला आहे. दरम्यान या नंतर शिवसेना उध्वव ठाकरे यांच्या या माजी नगरसेवक यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या विधानाची चर्चा आता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर होत आहे.खरी शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नसून ती उध्दव ठाकरे यांचीच आहे.या त्यांच्या वक्तव्याने आता महायुतीत मीठाचा खडा पडला आहे.आता महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तसेच या नगरसेवकांनी म्हटले आहे की रोज सकाळच्या भोंग्यामुळे उलटपक्षी शिवसेनेचेच नुकसान झाले आहे.असा आरोप त्यांनी नाव न घेता शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊतांवर करण्यात आला