पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट छत्तीसगड येथून आली असून.दरम्यान आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास छत्तीसगड येथील मुंगोली येथील रामबोड येथे कुसुम कंपनीच्या प्लांटची भली मोठी चिमणी अचानकपणे कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.सदर दुर्घटना मध्ये ८ ते ९ कामगारांचा मृत्यू झाला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या चिमणीच्या ढिगाऱ्याखाली एकूण २५ अन्य कामगार अडकले होते.त्यांना तातडीने बाहेर काढून तातडीने उपचारासाठी बिलासपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस पोहोचले आहेत.दरम्यान सदर ठिकाणी कामगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.