पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच छत्तीसगढ येथून खळबळजनक एक अपडेट हाती आली असून.छत्तीसगड येथील सुकमा- बीजापूर सीमेवर सुरक्षा दलाला तीन नक्षल वाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.दरम्यान छत्तीसगड येथे नुकतेच नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात सुरक्षा दलाचे वाहन उडवून दिल्याने एकूण ९ जवान या स्फोटात शहीद झाले होते.त्यामुळे आता सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी विशेष शोध मोहीम उघडली असून या शोधमोहीमेत तेव्हा आमनेसामने आल्यानंतर नक्षल वादी व जवान यांच्यात चकमक झाली आहे.सदरची चकमक चार तास सुरू होती.दरम्यान यात पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे.