पुणे दिनांक ९ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट बीड जिल्ह्यातून आली असून.परळीत करुणा मुंडे यांच्या कारमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने चक्क साडी परिधान करून बंदूक ठेवल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला होता.आता त्यांनी आज पैठण येथील सभेत बोलताना त्या पोलिस कर्मचारी याचे नाव जाहीर केले आहे.त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव संजय सानप असे आहे.आणि त्यांने हे कृत्य केले आहे असं देखील ठामपणे आमदार धस यांनी म्हटले आहे.दरम्यान या गुन्ह्यात गुन्हा न करता देखील करुणा मुंडे यांना तुरुंगाची हवा खावा लागली होती.दरम्यान आता बीडचे पोलिस अधीक्षक हे काय कारवाई पोलिस कर्मचारी संजय सानप याच्यावर करतात.हे आता स्पष्ट होईल.दरम्यान आज पैठण येथे बोलताना आमदार धस पुढे म्हणाले की.आता बीड मध्ये व परळीत खरेखुरे पोलिस पाठविण्या पेक्षा सोनी टीव्हीवरच्या सीआयडी मालिकेतील पोलिस पाठवावेत असे म्हणून त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रहार केला आहे.