पुणे दिनांक १० जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातील एक अपडेट हाती आली असून.पुण्यातील येरवडा येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या शुभदा कोदारे हिची हत्या तिच्या बरोबर कंपनीत काम करणाऱ्या सहकारी कृष्णा यांने आर्थिक वादातून भरदिवसा हत्या केली होती.आता उशिरा का होईना या हत्याची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे.दरम्यान या बाबत राष्ट्रीय महिला आयोगाकडून शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा एफआयआर तसेच अन्य केलेला कारवाईचा अहवाल येरवडा पोलिसांकडून दोन दिवसा मध्ये मागविण्यात आला आहे.दरम्यान यातील आरोपी कृष्णा हा भरदिवसा शुभदा हल्ला करत होता . तेव्हा आजुबाजुला अनेकजण बघत होते.पण कोणी देऊ तिचा बचाव केला नाही.असे देखील या हत्या बाबत महिला आयोगाच्या वतीने म्हटले आहे.