Home Breaking News राष्ट्रवादी काँग्रेसचा आज अजित पवारांचा बारामतीत सहयोग मध्ये जनता दरबार, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज अजित पवारांचा बारामतीत सहयोग मध्ये जनता दरबार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य मंत्री देखील घेणार जनता दरबार

47
0

पुणे दिनांक ११ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथील राजयोग सोसायटीतील निवासस्थानी जनता दरबार घेतला आहे, दरम्यान बारामती येथील अनेकजणांनी या जनता दरबारात आप आपल्या कामानिमित्ताने हजेरी लावली आहे. तसेच आता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री पुन्हा जनता दरबार भरविणारे आहेत.दरम्यान दर मंगळवारी मंत्री हसन मुश्रीफ व धनंजय मुंडे.दत्तामामा भरणे.मकरंद पाटील इत्यादी मंत्री जनता दरबार घेणार आहेत.तर बुधवारी सुनील तटकरे.बाबासाहेब पाटील.माणिकराव कोकाटे.तसेच नरहरी झिरवाळ.जनता दरबार घेणार आहेत.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मागील सहा वर्षांपासून जनता दरबार भरवत आहेत.या जनता दरबारच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

Previous articleशुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा उशिरा का होईना राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
Next articleमहाराष्ट्रात हवामानाचा लपाछपीचा खेळ सुरुच , कुठे दाट धुके तर कुठे ढगाळ वातावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here