पुणे दिनांक ११ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथील राजयोग सोसायटीतील निवासस्थानी जनता दरबार घेतला आहे, दरम्यान बारामती येथील अनेकजणांनी या जनता दरबारात आप आपल्या कामानिमित्ताने हजेरी लावली आहे. तसेच आता राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री पुन्हा जनता दरबार भरविणारे आहेत.दरम्यान दर मंगळवारी मंत्री हसन मुश्रीफ व धनंजय मुंडे.दत्तामामा भरणे.मकरंद पाटील इत्यादी मंत्री जनता दरबार घेणार आहेत.तर बुधवारी सुनील तटकरे.बाबासाहेब पाटील.माणिकराव कोकाटे.तसेच नरहरी झिरवाळ.जनता दरबार घेणार आहेत.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मागील सहा वर्षांपासून जनता दरबार भरवत आहेत.या जनता दरबारच्या माध्यमातून अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.