पिंपरी -चिंचवड दिनांक १२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पिंपरी -चिंचवड येथील भोसरी एमआयडीसी येथून एक खळबळजनक अपडेट आली असून.पिंपरी चिंचवड येथील भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीला भीषण आग लागली आहे.दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोसरी एमआयडीसी मधील ऋषी पाॅलिमार प्रायव्हेट लिमिटेड या रबर आणि प्लास्टिकच्या वस्तू तयार करणाऱ्या कंपनीला ही आग लागली असून घटनास्थळी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या एकूण १० गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान हे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम करत आहेत.दरम्यान या कंपनीला कशामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.दरम्यान सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.