पुणे दिनांक १२ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात वातावरणात सतत बदलत आहे एकंदरीत हवामान महाराष्ट्रात लपाछपीचा खेळ खेळत आहे.असे पाहायला मिळत आहे.कुठे ढगाळ तर कुठे धुके होते.तर कुठे थंडीचे वातावरण दिसत आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे.असल्याचे हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान उत्तर कोकणसह मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.तसेच मुंबईत दाट धुके पसरले आहे.तसेच येत्या पाच दिवसांमध्ये हवामान कोरडे राहणार असून तसेच थंडीचा जोर कायम राहणार आहे.