पुणे दिनांक १३ जानेवारी (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातून एक खळबळजनक अपडेट आली असून.पुण्यात चक्क चोरट्यांनी आता मेट्रोचेच लोखंडी खांब चोरुन नेल्यांची घटना घडली आहे.दरम्यान सदर चोरी संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.पुण्यात शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गिकेचे काम सुरू आहे.त्यामुळे मेट्रोच्या प्रशासनाच्या वतीने कामगार पुतळा येथे मेट्रोचे साहित्य ठेवले आहे.दरम्यान पुण्यातील चोरट्यांनी चक्क मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरुन नेले.दरम्यान या घटने नंतर पोलिसांनी 👮 आता सहा जणांना गजाआड केले आहे.